Ajit Pawar Video: अजित पवार यांनी हॉटेल मालकाचे निमंत्रण स्वीकारले, पण त्याला शॉवरखाली उभा केलं (पाहा व्हिडिओ)
पण, अजित पवारांनी त्याची भलतीच फिरकी घेतली. हॉटेलच्या एका रुममध्ये हॉटेल मालकाने बाथरुम दाखवले. तर अजित पवार यांनी त्याला चक्क शॉवरखालीच उभा केलं. अजितदादांच्या या हटके अंदाजामुळे उपस्थितांनाही हसू आवरले नाही.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मिश्किलपणा हे जणू समिकरणच. एका हॉटेल व्यवसायिकाने अजित पवार यांना हॉटेलला सदिच्छा भेट देण्यास बोलावले. आता बोलावलंय म्हटल्यावर अजित पवारही भेटायला गेले. पण, अजित पवारच ते. कधी काय करतील याचा नेम नाही. सर्व उपस्थितांच्या गराड्यात हॉटेल मालक अजित पवार यांना हॉटेल दाखवत होता. पण, अजित पवारांनी त्याची भलतीच फिरकी घेतली. हॉटेलच्या एका रुममध्ये हॉटेल मालकाने बाथरुम दाखवले. तर अजित पवार यांनी त्याला चक्क शॉवरखालीच उभा केलं. अजितदादांच्या या हटके अंदाजामुळे उपस्थितांनाही हसू आवरले नाही. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)