काय सांगता? वधूने XXX वेबसाइट PornHub.com ची लिंक जोडली आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर; जाणून घ्या सविस्तर
वधूने निमंत्रण पत्रिकेवर तिच्या अधिकृत लग्नाच्या वेबसाइटऐवजी PornHub.com ची लिंक नमूद केली होती.
कोणत्याही जोडप्यासाठी ‘लग्नाची तयारी’ हा एक आनंदाचा काळ असतो. परंतु हा काळ वधू, वर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप तणावपूर्ण देखील ठरतो. अगदी लग्नाच्या मुहूर्तापर्यंत गोष्टी राहू शकतात, चुकू शकतात किंवा ज्याचा विचारही केला नसेल अशी समस्या उद्भवू शकते. यामध्ये एक सर्रास चूक घडते ती निमंत्रण पत्रिकेबाबत. जर व्यवस्थित लक्ष दिले नाही तर, या निमंत्रण पत्रिकेमुळे मोठी फजिती होऊ शकते. नुकतेच एक लग्नात असा प्रकार घडला, ज्यामुळे वधूची मान शरमेने खाली गेली.
TikTok वर @Squidward.Tentacles या डिजिटल नावाने वावरणाऱ्या वधूने निमंत्रण पत्रिकेवर तिच्या अधिकृत लग्नाच्या वेबसाइटऐवजी PornHub.com ची लिंक नमूद केली होती. याला घाई म्हणा किंवा नजरचूक म्हणा, पण तिने तिच्या लग्नाची आमंत्रणे पाठवताना चुकून XXX अश्लील वेबसाइट, Pornhub.com ची लिंक जोडली होती. तिने नमूद केले होते- ‘लग्नासाठीची तुमची उपस्थिती नोंदवण्यासाठी कृपया आमच्या http://www.Pornhub.com वेबसाइटला भेट द्या.’
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)