Punjab Parking Lot Collapsed Video: पंजाबमधील मोहाली येथील इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब अचानक कोसळला; वाहनांचे मोठे नुकसान, Watch Video

वृत्तानुसार, बुधवारी दुपारी मोहालीच्या सेक्टर-83 मध्ये असलेल्या आयटी सिटीच्या प्लॉटमध्ये तळघर खोदण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अचानक शेजारील इमारतीचा पार्किंगचा भाग सुमारे 20 फूट खाली कोसळला.

Punjab Parking Lot Collapsed Video (PC - ANI)

Punjab Parking Lot Collapsed Video: पंजाबमधील मोहाली येथील एका इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब अचानक कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. बेकायदेशीरपणे बांधकाम करवून घेणाऱ्या इमारतीच्या मालकावर या घटनेचा ठपका ठेवण्यात येत आहे. या घटनेत तपासाच्या आधारे कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलं आहे. वृत्तानुसार, बुधवारी दुपारी मोहालीच्या सेक्टर-83 मध्ये असलेल्या आयटी सिटीच्या प्लॉटमध्ये तळघर खोदण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अचानक शेजारील इमारतीचा पार्किंगचा भाग सुमारे 20 फूट खाली कोसळला, त्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कार आणि काही दुचाकी खाली जमिनीसह गाडल्या गेल्या. (हेही वाचा - Biparjoy Cyclone Video: बिपरजॉय वादळ अवकाशातून कसं दिसतं? पहा व्हिडिओ)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement