Viral Video: 'खतरों के खिलाडी', फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर घेऊन नाचत होता, पाहा पुढे काय घडलं

सणासुदीच्या दिवशी फटाके फोडले जाता परंंतु फटाके फोडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असते.

Viral video PC TWITTER

Viral Video: सणासुदीच्या दिवशी फटाके फोडले जाता परंंतु फटाके फोडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुण मद्यधुंद अवस्थेत फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर घेऊन नाचत आहे. एकाने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आहे. पण जळत्या फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर घेऊन नाचणे तरुणांच्या जीवाशी बेतला आहे. नाचताना एक फटाका त्याच्या अंगावर पडला आणि त्याच्या कपड्याला आग लागते. क्षणात मद्यधुंद अवस्थेत असलेला तरुण फटाक्यांच्या बॉक्ससहीत जमीनीवर पडतो. सगळे फटाके जमिनीवर पकडतात. निष्काळजीपणामुळे अनेकांना दुखापत झाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एकाने या व्हिडिओवर खतरों के खिलाडी असं लिहले आहे. (हेही वाचा- तेलंगणातील वारंगलमध्ये पेट्रोल कर्मचाऱ्याकडून पेट्रोलची चोरी)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement