काय सांगता? 26 वर्षांची नोकरी आणि घेतली फक्त 1 दिवस रजा; बिजनौरच्या Tejpal Singh यांच्या विक्रमाची India Book Of Records मध्ये नोंद (Video)
तेजपाल यांनी 1995 ते 2021 या काळात केवळ एकच रजा घेतली. 18 जून 2003 रोजी त्यांचा धाकटा भाऊ प्रदीप कुमार यांचे लग्न झाल्यावर त्यांनी ही सुट्टी घेतली.
जगात दर आठवड्याला 3 दिवसांची रजा मिळण्याची चर्चा असताना, उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये राहणाऱ्या तेजपाल सिंह यांनी आपल्या 26 वर्षांच्या सेवेत केवळ एक दिवस सुट्टी घेतली आहे. रविवारीही ते कार्यालयात येतात. हे थोडे चित्र वाटेल पण हे खरे आहे. तेजपाल सिंह यांच्या या विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. तेजपाल सिंह यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या 26 वर्षांच्या कारकिर्दीत फक्त एकच सुट्टी घेतली आहे. होळी असो, दिवाळी असो वा रविवार, ते नेहमी कार्यालयात हजर असतात. तेजपाल यांनी सांगितले, ‘मी 1995 पासून कंपनीत काम करत आहे. एका वर्षात सुमारे 45 सुट्या असतात. पण आजपर्यंत मी एकच रजा घेतली आहे. हे काम मी माझ्या स्वेच्छेने करतो. यामुळे एक विक्रम झाला.’ हे उल्लेखनीय आहे की, सध्या कॉर्पोरेट जगतात आठवड्यातून 3 दिवस काम करून कर्मचाऱ्यांची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे. पण या वादात बिजनौर जिल्ह्यातील या व्यक्तीने आपल्या 26 वर्षांच्या कारकिर्दीत फक्त एकच सुट्टी घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबर 1995 रोजी तेजपाल सिंह द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी लिपिक म्हणून रुजू झाले होते. जर कंपनीच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि सणाच्या सुट्ट्यांचा समावेश केला, तर एका वर्षात अंदाजे 45 सुट्ट्या मिळतात. पण तेजपाल यांनी 1995 ते 2021 या काळात केवळ एकच रजा घेतली. 18 जून 2003 रोजी त्यांचा धाकटा भाऊ प्रदीप कुमार यांचे लग्न झाल्यावर त्यांनी ही सुट्टी घेतली. (हेही वाचा: 3-Foot Tall Dr. Ganesh Baraiya: डॉ. गणेश बरैया, तीन फुट उंची MBBS करण्यासाठी सुप्रीम कोर्ट पर्यंत लढाई; वाचा एका संघर्षाची कहाणी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)