Kunal Raut Arrested: पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याप्रकरणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक, पाहा व्हिडिओ
नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासलं या प्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी रविवारी अटक केली,
Kunal Raut Arrested: नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासलं या प्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी रविवारी अटक केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना जिल्हा परिषद कार्यालयाजवळ शनिवारी घडली, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कुणाल याने जिल्हा परिषद कार्यलयाजवळ असलेल्या पंत प्रधान नरेंद्र याचा फोटो असलेला पोस्टरला काळं फासलं आहे. कुणाला राऊत हे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांचे पुत्र आहेत. नागपूरपासून 40 किमी अंतरावर असलेल्या कुही गावातून कुणालाला अटक करण्यात आले.
मोदी सरकार का भारत सरकार ?
भारत सरकारव्दारे विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. सदर योजना विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात येतात. मोदी सरकारची हमी असे उल्लेखित बॅनर्स नागपूर जिल्हा… pic.twitter.com/7SkvlA45K3
— Kunal Raut (@KunalNitinRaut) February 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 05, 2024 07:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

