'होय, संघर्ष करणार!!'; मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर Sanjay Raut यांनी स्पष्ट केली शिवसेनची भूमिका

मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर नेते संजय राऊत यांनी एक ट्वीट करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घालत चर्चेसाठी निमंत्रण दिले. जर शिवसेनेतील लोकांनाच मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल, तर मी पद सोडायला तयार आहे परंतु ही गोष्ट मला प्रत्यक्ष भेटून सांगावी, असेही ते म्हणाले. अशात मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर नेते संजय राऊत यांनी एक ट्वीट करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत यांनी, 'होय, संघर्ष करणार!!' असे ट्वीट केले आहे. यावरून शिवसेना भाजपची हातमिळवणी करणार नसल्याचे दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement