Yashomati Thakur: काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि पोलीस यांच्यात बाचाबाची; सूरतला जाताना अडवल्याने वाद
राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी जात असल्याने गुजरात पोलिसांनी अडवल्याचा आरोप देखील त्यांनी केला
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या समर्थनासाठी सुरतला जात असताना काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांची गाडी गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) अडवल्यानंतर पोलीस आणि यशोमती ठाकूर यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी यशोमती ठाकूर यांनी गुजरातमध्ये जाणाऱ्या दारुची देखील अशीच चौकशी केली जाते का असा प्रश्न यावेळी पोलिसांना विचारला. तसेच एकनाथ शिंदेसोबत जेव्हा आमदार मुंबईतून सुरतला गेले होते तेव्हा त्यांची चौकशी केली होती का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी जात असल्याने गुजरात पोलिसांनी अडवल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यावेळी त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करुन आपल्या सोशल मिडियावर शेअर केला आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)