Yashashri Shinde Death Case: यशश्रीच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या उरणकरांचा पोलीस स्थानकावर मोर्चा; मारेकऱ्याला ताब्यात देण्याची केली मागणी
मोठ्या संख्यने उरणकर नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. उरणमधील महात्मा गांधी पुतळ्याजवळून मोर्चाला सुरुवात झाली होती. आरोपीला अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली.
नवी मुंबईच्या उरणमध्ये राहणाऱ्या यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करून तिचा मृतदेह झाडाझुडपामध्ये फेकून देण्यात आला होता. यशश्रीच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या उरणकरांनी तिला न्याय मिळावा यासाठी आज मोर्चा काढला होता. यशश्रीला न्याय मिळावा यासाठी उरणमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोठ्या संख्यने उरणकर नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. उरणमधील महात्मा गांधी पुतळ्याजवळून मोर्चाला सुरुवात झाली होती. आरोपीला अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)