Lalbaghcha Raja: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेला आली फीट, पोलिसांनी उचलून रुग्णालयात केलं दाखल, Video Viral
त्यामुळे अनेकांचे आरोग्यही बिघडते. अशीच एक घटना समोर आली आहे.
एक महिला दर्शनासाठी आली होती, गर्दीत अचानक तिला फीट आली, हे पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला तात्काळ उचलून पोलीस गाडीत बसवले आणि रुग्णालयात नेले. गेल्या अनेक दिवसांपासून लालबागचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सेलिब्रिटींना विशेष आदर दिला जातो, पण सर्वसामान्य भाविकांना मूर्तीच्या पायाला हात लावूही दिला जात नाही. या घटनेत पोलिसांनी सतर्कता दाखवत महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)