Mumbai Police: खाकीतील मातृत्व; मनोरुग्ण आईच्या नवजात बाळाची महिला पोलीसांनी घेतली काळजी
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे.
Motherhood In Khaki: मुंबईतील कुर्ला परिसरातील एलबीएस मार्गावरील फूटपाथवर एका मानसिकदृष्ट्या अस्थिर महिलेने बाळाला जन्म दिल्याची माहिती मिळताच कुर्ला येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. कुर्ला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी 45 दिवस नवजात बाळाची काळजी घेतली, कारण महिलेच्या इतर नातेवाईकांबद्दल कोणतीही माहिती नव्हती आणि महिला बाळाची काळजी घेण्यास असमर्थ होती, पोलीस कर्मचाऱ्यांनी नवजात बालकाचे नाव ठेवले असून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आईला ठाणे मनोरुग्णालयात तर नवजात बाळाला कांजूरमार्ग येथील वात्सल्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलीसांनी या संदर्भात फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)