Bharat Gogawale On Sanjay Raut: भरत गोगावलेंची जीभ घसरली, म्हणाले "तो साप संजय राऊतांच्या तोंडाला चावायला हवा होता"

संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरी साप निघाला. त्यानंतर सगळीकडे खळखळ उडाली होती

Bharatshet Gogawale | (File Image)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरी साप निघाला. त्यानंतर सगळीकडे खळखळ उडाली होती. सुदैवानं यावेळी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही. यावर प्रतिक्रीया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेत भरत गोगावले यांची जीभ घसरली. भरत गोगावले म्हणाले, “संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरामध्ये निघालेला साप त्यांच्या तोंडाला चावायला हवा होता. कारण संजय राऊत खूप बोलतात. अति तिथे माती हे ठरलेलं आहे. माणसाने किती बोलावं यासाठी प्रत्येकाला लिमिट आहे.

सापानं संजय राऊतांना कमी बोलण्याचा इशारा दिला असेल. संजय राऊत चुकीचं बोलू नका असं सांगण्यासाठी साप निघाला असेल.”

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement