मुंबई: पुढील 2-3 महिन्यांत धारावीमधील नागरिकांचे 100% लसीकरण करण्याची योजना- खासदार राहुल शेवाळे
कोविड-19 लसीकरण केंद्राबाहेर झालेली मोठी गर्दी व्हिडिओत पाहायला मिळत आहे. पुढील 2-3 महिन्यांत धारावीमधील 100% नागरिकांचे लसीकरण करण्याची आमची योजना आहे.
कोविड-19 लसीकरण केंद्राबाहेर झालेली मोठी गर्दी व्हिडिओत पाहायला मिळत आहे. पुढील 2-3 महिन्यांत धारावीमधील नागरिकांचे 100% लसीकरण करण्याची आमची योजना आहे. पहिल्या टप्प्यात खाजगी रुग्णालयात 10,000 स्लॉट्स बुक करण्यात आले होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात 30,000 स्लॉट स्वतंत्रपणे बुक करण्यात येतील. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या खासगी रुग्णालयांना यापूर्वी लसींचे आदेश दिले होते. या मोहिमेसाठी प्रायोजक आमचे समर्थन करत आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)