Weather Forecast : कोकण, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावासाची शक्यता- भारतीय हवामान विभाग
महाराष्ट्रात पुढचे चार पाच दिवस मुसळधार पावसाची शक्याता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळेल. तसेच, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासहही पाऊस होईल, असे हवामान विभागाने अंदाज वर्तवताना म्हटले आहे.
महाराष्ट्रात पुढचे चार पाच दिवस मुसळधार पावसाची (Torrential Rains) शक्याता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज (Weather Forecast) भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. या काळात मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळेल. तसेच, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासहही पाऊस होईल, असे हवामान विभागाने अंदाज वर्तवताना म्हटले आहे. पावसाच्या काळात अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्या, शेतीची कामे करताना विजा चमकत असताना काम करणे शक्यतो टाळा, असे अवाहन हवामान विभागाने केले आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा, Aurangabad Rain: औरंगाबाद मध्ये मुसळधार पावसामुळे नरेगाव जलमय; पहा दृश्यं)
मुसळधार पावसाची शक्यता विचारात घेऊन हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.यामध्ये रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी 4 आणि 5 ऑक्टोबर या दिवसासाठी यलो अलर्ट आहे. 6 ऑक्टोबर या दिवशी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि 7 ऑक्टोबर या दिवशी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला आहे.
ट्विट
राज्यात गेल्या काही काळापासून वातावरण मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहे. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रात गुलाब चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील इतर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. विदर्भ, मराठवाडा आदी ठिकाणीही मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सतत दुष्काळी हा शिक्का बसलेल्या मराठवाड्यात प्रथमच महापूरजन्य स्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती आणि शेतकऱ्याचे झालेले नुकसान पाहून राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे. राज्य सरकारने म्हटले आहे की, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन आवश्यक ती मदत जाहीर केली जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)