Driver Watches Videos On Mobile While Driving: भरधाव गाडी वेगात आणि ड्राव्हर फोनमध्ये व्हिडिओ पाहण्यास व्यस्त, समृध्दी महामार्गावरील व्हिडिओ व्हायरल

बस चालक आणि बसची मालकी असलेल्या एजन्सीच्या निष्काळजीपणा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे

Viral video

Driver Watches Videos On Mobile While Driving: एका बस चालक बस चालवत असताना प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मोबाईल फोनमध्ये व्यस्त असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बस चालक आणि बसची मालकी असलेल्या एजन्सीच्या निष्काळजीपणा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. प्रवाशांचा आणि रस्त्यावरील इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात आणला असता असं कंमेट यात करण्यात आले आहे. ही बस नागपूर हून पुण्याकडे जात असताना बस चालक फोन मध्ये व्हिडिओ पाहत आहे.  समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी बस भरधाव वेगात जात होती आणि बसचा चालक बसच्या स्टेअरिंगजवळ फोन ठेवून मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहत होता आणि फोनवर व्हिडिओ पाहताना बस कुठल्या दिशेने जात आहे याची त्याला पर्वा नव्हती. हा धोकादायक स्टंट पाहून नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now