Watch: उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी समृद्धी महामार्गावर धावल्या बैलगाड्या, व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओमध्ये समृद्धी महामार्गावरून बैलगाड्या धावताना दिसत आहेत. या व्हिडीओची तारीख आणि ठिकाण याची पडताळणी होऊ शकली नाही,

समृद्धी महामार्गावर बैलगाड्या

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महाराष्ट्रातील नागपुरात समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. परंतु उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी महामार्गावर काढलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये समृद्धी महामार्गावरून बैलगाड्या धावताना दिसत आहेत. या व्हिडीओची तारीख आणि ठिकाण याची पडताळणी होऊ शकली नाही, मात्र, व्हिडिओमध्ये दिसणार्‍या भागात, उद्घाटनासाठी लावण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे कटआउट्स दिसत आहेत. समृद्धी महामार्गावर दुचाकी, तीन चाकी वाहनांना तसेच बैलगाड्यांना प्रवेश नाही. वाहनांची वेग मर्यादा ताशी 120 आणि 150 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement