Wagh Nakh Update: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असणारी वाघनखे 19 जुलैला साताऱ्यात दर्शनासाठी ठेवली जाणार; मंत्री Sudhir Mungantiwar यांची माहिती

याआधी 1659 मध्ये विजापूर सल्तनतचा सेनापती अफझलखान याला मारण्यासाठी मराठा साम्राज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ नखे ही साताऱ्यातच असल्याचा दावा एका इतिहासकाराने केल्याच्या काही दिवसानंतर मुनगंटीवार यांचे हे वक्तव्य आले आहे.

Shivaji Maharaj's Wagh Nakh (PC - Twitter/@MeghUpdates)

Wagh Nakh Update: छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत मागच्या वर्षी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. आता येत्या 19 जुलै 2024 रोजी ही वाघनखे महाराष्ट्रात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असणाऱ्या या वाघनखांबद्दल सुरू असलेल्या खोट्या आणि निरर्थक प्रचाराबद्दल आज विधानसभेत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले. 19 जुलै रोजी ही वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत.

ते म्हणाले, लंडनहून राज्यात आणले जाणारे वाघ नख किंवा वाघाच्या पंजाच्या आकाराचे शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांनीच वापरले होते. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून हे शस्त्र महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारने अनेक कोटी रुपये खर्च केल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला आणि प्रवास खर्च आणि करारावर स्वाक्षरी करण्यासाठी 14.08 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले. याआधी 1659 मध्ये विजापूर सल्तनतचा सेनापती अफझलखान याला मारण्यासाठी मराठा साम्राज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ नखे ही साताऱ्यातच असल्याचा दावा एका इतिहासकाराने केल्याच्या काही दिवसानंतर मुनगंटीवार यांचे हे वक्तव्य आले आहे. (हेही वाचा: Manoj Jarange Patil: मराठा समाजाला त्रास देणाऱ्या सर्वांना विधानसभा निवडणुकीत पाडा: मनोज जरांगे पाटील)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now