Wagh Nakh: अखेर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली; पहा पहिली झलक (See Photo)

व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, लंडन येथून वाघनखे आणली असून, ही शिवकालीन वाघनखे संग्रहालयातील दालन क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात येणार आहेत.

Wagh Nakh

Wagh Nakh: अखेर आज, 19 जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे शाहूनगरी सातारा येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा येथे ऐतिहासिक 'वाघनखां'च्या विशेष आकर्षणासह, शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शन दालनाचे उदघाटन पारे पडले. त्यानंतर वाघनखांची पहिली झलक समोर आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. वाघनखां'च्या प्रदर्शनार्थ सातारा येथे त्यांची भव्य रॅली काढण्यात आली. उद्यापासून ही वाघनखे जनतेसाठी पाहण्यासाठी खुली होणार वाहेत.

व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, लंडन येथून वाघनखे आणली असून, ही शिवकालीन वाघनखे संग्रहालयातील दालन क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात येणार आहेत. वाघनखाच्या संरक्षणाकरीता सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सार त्याचप्रमाणे संरक्षण यंत्रणेमार्फत बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. दररोज सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी 2 शाळेच्या विद्यार्थ्यांना वाघनखे पाहण्यास निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. इतर प्रेक्षकांना 10 रुपये प्रमाणे तिकीट आकारण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेत वाघनखे पाहण्यास खुले राहणार आहे. (हेही वाचा: Gadchiroli: संपूर्ण उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त मुक्त; पोलिसांची माहिती)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now