आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाची महापूजा करतात. यंदा ही महापूचा 10 जुलै 2022 रोजी पहाटे 02.00 वाजता पार पडणार आहे. या पूजेचे थेट प्रक्षेपण आपण येथे पाहू शकता. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विठू माऊलीच्या भक्तांना घरबसल्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल- रूक्मिणी मंदिरातील थेट सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावर त्याची खास सोय करण्यात आली आहे.
"बोलावा विठ्ठल"
श्री क्षेत्र पंढरपूर येथून..श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापुजेचे..
थेट प्रसारण/प्रवाह..
रवि.10 जुलै 2022,पहाटे 02.00 वा.
पुनःप्रसारण सकाळी 09.00 वा.#AshadiEkadashi pic.twitter.com/jvvsh04VJ1
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)