Vinod Tawde's Mother Passes Away: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना मातृशोक; विजया श्रीधर तावडे यांचे दीर्घ आजाराने निधन

विजया तावडे या 85 वर्षांच्या होत्या। उद्या, 11 एप्रिल रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विजया श्रीधर तावडे

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना मातृशोक झाला आहे. तावडे यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणतात, 'हे कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, माझी आई विजया श्रीधर तावडे यांचे दीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले आहे.' विजया तावडे या 85 वर्षांच्या होत्या। उद्या, 11 एप्रिल रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात विनोद तावडे यांच्यासह उद्योजक पुत्र विलास, विवेक ही मुले, कन्या जयश्री कदम, सामाजिक कार्यकर्त्या स्नुषा वर्षा तावडे आणि मोठा आप्त परिवार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now