Children Swept Into Bhushi Dam Update: भुशी धरणामागील धबधब्यात वाहुन गेलेल्या 5 जणांचा व्हिडिओ व्हायरल; पहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलेसह मुलं धबधब्यात वाहून जाताना दिसत आहेत.
Children Swept Into Bhushi Dam Update: महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन लोणावळा येथील भुशी धरणाजवळील धबधब्यात रविवारी दुपारी चार ते पाच पर्यटक वाहून गेले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलेसह मुलं धबधब्यात वाहून जाताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलिस आणि स्थानिक स्वयंसेवकांची टीम पर्यटकांना शोधण्यासाठी काम करत आहे. धरणाजवळील रेल्वेच्या विश्रामगृहाच्या मागे हा धबधबा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेपासून या भागात मुसळधार पावसामुळे भुशी धरण ओव्हरफ्लो होऊन धबधब्यांच्या प्रवाहात वाढ झाली आहे. (हेही वाचा - Bhushi Dam Overflow: मोठी बातमी! भुशी धरणामागील धबधब्यात पाच मुले वाहून गेले; शोधकार्य सुरु (Watch Video))
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)