Video: ब्रेक फेल झालेला ट्रक महामार्गावर भरधाव वेगात धावत सुटला; खंडाळा घाटातील थरारक घटना (Watch)
व्हिडीओमध्ये दिसत आहे क्की, ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रक डिव्हायडरला घासून पुढे पुढे जात आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. या महामार्गावर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता खंडाळा घाटातील एक थरारक घटना समोर आली आहे. एक ब्रेक फेल झालेला ट्रक घाटाच्या उतारावरून भरधाव वेगाने धावत असलेला दिसत आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे क्की, ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रक डिव्हायडरला घासून पुढे पुढे जात आहे. महामार्गावर इतरही वाहनांनी ये-जा चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये या ट्रकमुळे एक मोठा अपघात शक्यता होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)