Vani Jairam Passes Away: ज्येष्ठ गायिका वाणी जयराम राहत्या घरी आढळल्या मृतावस्थेत; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दक्षिण भारतातील प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांंचे निधन झाले आहे.

वाणी जयराम । Facebook

दक्षिण भारतातील प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांंचे निधन झाले आहे. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वाणी जयराम राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यंदाच्या वर्षीच त्यांना 'पद्मभूषण' हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता. गुड्डी (1971) या हिंदी चित्रपटातून 'बोले रे पापी हारा' या  मियाच्या मल्हार रचनेतून त्यांनी पार्श्वगायनात पदार्पण केले होते. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)