Varsha Gaikwad Resigns As MLA: वर्षा गायकवाड यांचा आमदारकीचा राजीनामा; धारावीकरांसाठी शेअर केली भावनिक पोस्ट
'गायकवाड कुटुंबाला धारावीने नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे आणि त्या प्रेमाचे ऋण आमचे कुटुंब यापुढेही फेडत राहील' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदार वर्षा गायकवाड यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये त्यांनी भाजपाच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. मात्र 4 वेळेस धारावीमधून त्या आमदार राहिल्यानंतर आता लोकसभेमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचं नेतृत्त्व करणार आहेत. 'धारावीकरांच्या हक्काच्या या लढ्यात मी आणि माझे कुटुंब नेहमीच सहभागी होतो, आहोत आणि राहणार. आपण सर्वजण एकजुटीने लढू आणि नक्कीच जिंकू.' अशा भावना पोस्ट करत त्यांनी मतदारांचे आणि धारावीकरांचे आभार मानले आहेत.
वर्षा गायकवाड यांची पोस्ट
आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. ज्या धारावीतून मी ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले, ते पद मला आज आयुष्याच्या एका नव्या वाटेवर पुढे मार्गक्रमण करण्यासाठी सोडावे लागत आहे. आज संसदेच्या सदस्यत्वाच्या नियमांचे पालन करून मी धारावीच्या आमदार पदाचा राजीनामा देत आहे.
पण आज मी जी… pic.twitter.com/Qu8AnL5bSm
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2024 12:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

