Priyanka Chaturvedi On VBA And MVA: वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी सोबत काम करावे- प्रियंका चतुर्वेदी (Video)
तेव्हा ते आम्ही 'तानाशाह' च्या विरोधात लढत आहोत, असे म्हणाले.
शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी चित बहुजन आघाडी (VBA) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यातील संबंधांवर भाष्य करताना म्हटले की, VBA चे प्रमुख प्रकाश आंबेडकर भारत जोडो यात्रेच्या संयुक्त रॅलीला आले होते. तेव्हा ते आम्ही 'तानाशाह' च्या विरोधात लढत आहोत, असे म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणे ही प्रत्येक गटाची जबाबदारी आहे. महाविकासआघाडीचेही ध्येय तेच आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनीही आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून यावे. एकत्र लढण्याबाबत ते नक्की विचार करतली, अशी आशा आहे, चर्चा अद्यापही सुरुच असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले. (हेही वाचा, Political Pressure on Indian Judiciary : 'राजकीय गटाकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न', 600 वकिलांचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र)
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)