Uddhav Thackeray meets Sharad Pawar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट

या भेटीसाठी संजय राऊत हेदेखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते.

Uddhav Thackeray meets Sharad Pawar

शिवसेना (UBT) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीसाठी संजय राऊत हेदेखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. यासह खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) कोणाशीही सल्लामसलत केली नाही, असे पवार यांनी एका मुलाखतीत सांगितल्यानंतर ठाकरे यांची पवारांची भेट घेतली. या चार नेत्यांमध्ये जवळपास सव्वा एक तास चर्चा झाली. महाविकास आघाडीत समन्व राहावे, मतभेद उघडपणे समोर येऊ नयेत, या विषयाबाबत ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. (हेही वाचा: माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन करणार; बाबरी मशीद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)