बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरता जनतेसमोर येण्याचे Uddhav Thackeray यांचे शिंदे गटाला आव्हान
पुढे ते म्हणाले, 'जे नाव नव्या आजोबांनी दिले, जे नाव माझ्या वडिलांनी रुजवले आणि ज्या नावाचे विचार मी पुढे घेऊन जात आहे त्या नावाशी तुमचा संबंधच काय?'
काल निवडणूक आयोगाने एक महत्वाचा निर्णय देत शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. येऊ घातलेल्या अंधेरी पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांना हे चिन्ह वापरता येणार नाही. या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, 'ज्या शिवसेनेने तुम्हांला राजकीय जन्म दिला, ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, हिंदु अस्मिता जपली त्या शिवसेनेचा तुम्ही घात करायला निघालात? काय मिळाले तुम्हांला?' असा सवाल शिंदे गटाला विचारला.
पुढे ते म्हणाले, 'जे नाव नव्या आजोबांनी दिले, जे नाव माझ्या वडिलांनी रुजवले आणि ज्या नावाचे विचार मी पुढे घेऊन जात आहे त्या नावाशी तुमचा संबंधच काय? संकट येतात आणि जातात पण संकटात संधी लपलेली असते. ती संधी मी शोधतोय, त्या संधीच मी सोन करुन दाखविण.' यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला एक आव्हान दिले. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरता जनतेसमोर येण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)