Trans Harbour Line Update: ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत
मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. पण आता हळूहळू पुन्हा मुंबईची लोकल पूर्वपदावर येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून ठाणे- ऐरोली दरम्यान गर्डर झुकल्याने रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेक चाकरमान्यांचे हाल झाले होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शुक्रवारी पहाटे 1-4 दरम्यान नवीन ऐरोली-कटाई नाका लिंक रोडसाठी 10 गर्डरचे काम हाती घेतले होते पण ते करताना झालेल्या गोंधळामुळे सकाळी नागरिकांना त्याचा फटका बसला. नक्की वाचा: Mumbai Trans Harbour Update: मुंबई लोकलची ट्रान्स हार्बर लाईन वरील सेवा ठप्प; गर्डर झुकला.
ट्रान्स हार्बर सेवा विस्कळीत
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)