Nagpur: नागपूरातील हिंगणा एमआयडीसीतील कारखान्याला आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

Hingana Midc fire

नागपूरातील (Nagpur) हिंगणा एमआयडीसीतील (Hingana Midc) सोनेगाव निपाणी येथे कटारिया अ‍ॅग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागली, सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती आहे. यात 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन कामगार आतमध्ये अडकल्याची माहिती आहे.  दरम्यान घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले असून, आता आग नियंत्रणात आहे. या घटनेत 3 कामगार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now