Viral Video: रिक्षाच्या ड्राइवर सीटवर तीघे जण! व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात रिक्षा चालकाने ड्राइवर सीट आणखी दोन जणांना बसून गाडी चालवली आहे

bandra Viral Video PC TWITTER

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात रिक्षा चालकाने ड्राइवर सीट आणखी दोन जणांना बसून गाडी चालवली आहे. ही घटना कुण्या गावाची नसून मुंबईतील वांद्रा परिसरातील आहे. डिगू नावाच्या (X) एक्सच्या वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि पोस्ट लिहले आहे. त्यात त्याने मुंबई पोलिसांना टॅग केले आहे. पोस्टमध्ये लिहले आहे की, हा व्हिडिओ भारतातील कोणत्याही गावातील नसून मुंबईतील वांद्रा परिसरातला आहे. यावर लवकरात लवकर कारवाई झालीच पाहिजे असं देखली सांगण्यात आले आहे. रिक्षा चालक कोणत्याही प्रकराचा ट्राफिक रुल फोलो करत नाही. नियमांचे उल्लंघन करून त्याने ड्राईवर सीटवर दोघांवर बसवले आहे. यावर कारवाई झाली पाहिजे. व्हिडिओ व्हायरल होताच, मुंबई पोलिसांनी यावर प्रतिक्रिया नाेंदवली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, या संदर्भात वांद्रा ट्राफिक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. लवकरच यावर कारवाई करण्यात येईल. व्हायरल झालेल्या व्हिडिओला अनेकांना संतापाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement