Ice Cream Chor Arrested: सुपरमार्केटमधून आईस्क्रीमसह डीप फ्रीझर चोरणाऱ्या चोरट्यांना अटक
तक्रारदार आणि सुपरमार्केटचे मालक जयेश पटेल यांचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की, हा गुन्हा 28 मे रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास घडला.
Ice Cream Chor Arrested: सुपरमार्केटमध्ये ठेवलेले 1.25 लाख रुपये किमतीचे डीप फ्रीझर चोरल्याच्या आरोपावरून तीन तासांत दोन जणांना अटक करण्यात आली. ओमराव राबरीयो (24) आणि वोटाराम मेघवाल (25) असे या दोघांचे नाव असून त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार आहे. तक्रारदार आणि सुपरमार्केटचे मालक जयेश पटेल यांचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की, हा गुन्हा 28 मे रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास घडला.
पटेल यांच्या तक्रारीच्या आधारे, स्टोअरमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज स्कॅन करून तपास सुरू करण्यात आला. व्हिज्युअलमध्ये, तीन लोक फ्रीजर उचलून टेम्पोमध्ये लोड करताना दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी टेम्पो तसेच आरोपीचा मोबाईल क्रमांक शोधण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपास आणि विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या मदतीने दोघांना त्याच दिवशी पहाटे 5 वाजता नालासोपारा येथून अटक करण्यात आली. (हेही वाचा - 'Ice Cream Chor' Caught on Camera in Mumbai: बोरिवलीतील सुपरमार्केटमधून चोरट्यांनी चोरला आईस्क्रीमसह डीप फ्रीझर; आईस्क्रीम चोरांचा CCTV व्हिडिओ व्हायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)