Sharad Pawar Gets Death Threat: शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधुन अटक, आरोपीला गुरुवारी न्यायालयात करणार हजर

आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. नारायणविरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Sharad Pawar (Photo Credit - Twitter)

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरी फोन करून घरगुती वाद सोडविण्यास मदत न केल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारची राजधानी पाटणा येथून अटक करण्यात आली आहे. नारायण सोनी असे आरोपीचे नाव असून आज दुपारपर्यंत पोलिसांचे पथक त्याला मुंबईला घेऊन जाणार आहे. आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. नारायणविरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांनी पवारांना अनेकदा धमक्या दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now