MLAs Disqualification Case: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांनी होणार

या सुनावणीत त्यांनी खटला निकाली काढण्यासाठी कालमर्यादा ठरवावी. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण दोन आठवड्यांनंतर सुनावणीसाठी ठेवलं आहे.

Shiv Sena Dasara Melava | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

MLAs Disqualification Case: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. आता तीन आठवड्यांनी यावर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 56 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर आठवडाभरात सुनावणी घेण्यासाठी यादी तयार करण्यास सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सांगितले आहे. या सुनावणीत त्यांनी खटला निकाली काढण्यासाठी कालमर्यादा ठरवावी. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण दोन आठवड्यांनंतर सुनावणीसाठी ठेवलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)