मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कठोर SOPs लावण्याबाबत निर्णय घेतील; आपणास संसर्गाची साखळी तोडावी लागेल- Minister Aslam Sheikh
ते म्हणाले, 'आम्हाला संक्रमणाची साखळी तोडावी लागेल. राज्यात जर प्रकरणांची संख्या कमी असती, तर आपण लॉकडाउन टाळू शकलो असतो.'
महाराष्ट्र मंत्री अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आज कठोर SOPs लावण्याबाबत निर्णय घेतील. ते म्हणाले, 'आम्हाला संक्रमणाची साखळी तोडावी लागेल. राज्यात जर प्रकरणांची संख्या कमी असती, तर आपण लॉकडाउन टाळू शकलो असतो. रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.' ते पुढे म्हणाले, 'लक्षणे नसलेल्या सेलिब्रेटींनी घरी उपचार केले पाहिजेत, रुग्णालयातील बेड्स घेऊ नये. अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर यांसारख्या काही सेलिब्रिटींना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. असे बेड्स गरजूंसाठी असायला हवेत.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)