Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; बुधवारी शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, गांधीनगर, इंटरनिटी, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, इंदिरानगर, श्रीनगर, समतानगर, रुस्तमजी, सिद्धांचल, रुपादेवी, सिद्धेश्वर, येथे पाणीपुरवठा बंद असणार आहे.

Water Cut | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. बुधवारी ठाण्यातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कारण, ठाण्यात पावसाळापूर्व अत्यावश्यक निगा आणि देखभाल दुरुस्तीची कामासाठी महानगरपालिकेने हाती घेतली आहेत. त्यामुळे या काळात ठाण्यातील विविध भागातील पाणीपुरवठा बुधवारी बंद असणार आहे. पाणीपुरवठा योजना आणि स्टेम प्राधिकरण या दोन्हींकडे बुधवार आणि गुरुवार २९ मे, २०२४ रोजी सकाळी ९.०० ते गुरूवार, ३० मे, २०२४ रोजी सायंकाळी ९.०० असे २४ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, गांधीनगर, इंटरनिटी, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, इंदिरानगर, श्रीनगर, समतानगर, रुस्तमजी, सिद्धांचल, रुपादेवी, सिद्धेश्वर, येथे पाणीपुरवठा बंद असणार आहे. याशिवाय, जॉन्सन यांच्यासह मुंब्रा आणि कळवा येथील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. (हेही वाचा -BMC Property Tax: मुंबई महापालिकेकडून 4,856 कोटींचा मालमत्ता कर जमा)

ठाणे महानगरपालिका ट्विट -