Thane Weather Forecast: ठाणे जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता- IMD
तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यताही आयएमडीने व्यक्त केली आहे.
Thane Weather Forecast: भारतीय हवामान खात्याने सोमवारी दुपारी मुंबई आणि शेजारील ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. हा इशारा मंगळवारपर्यंत कायम राहणार आहे. मात्र आता पुढील 3-4तासांत ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यताही आयएमडीने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांच्या मते, या उन्हाळ्यात पुढील तीन महिन्यांत आणखी उष्णतेच्या लाटेसह संपूर्ण महाराष्ट्रात किमान 1-2 अंशांनी तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विशेषतः किनाऱ्यावरील शहरांमध्ये आर्द्रता आणि उष्णतेमुळे अंदाजित तापमान वास्तविक तापमानापेक्षा जास्त असेल. त्यामुळे मुंबईकरांची तसेच कोकण किनारपट्टीतील लोकांना अधिक गैरसोय होऊ शकते. (हेही वाचा: Mumbai Weather Forecast: मुंबईत उष्णतेची लाट? नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता)