Thane Water Cut: ठाण्यात STEM Pipeline मध्ये पाणी गळती मुळे तातडीने दुरूस्तीचं काम हाती; आज पहा कुठल्या भागात पाणी पुरवठा विस्कळीत?
मुंब्रा, रेतीबंदर, कळवा, खारेगाव आणि ठाण्यातील इतर अनेक भागांत आज पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
Thane Municipal Corporation कडून आज 19 एप्रिल दिवशी ठाण्यात कमी दबाने पाणीपुरवठा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या ठाण्यात पाईपलाईन च्या दुरूस्तीचं काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गळतीचं काम सुरू होतं त्यापार्श्वभूमीवर हे काम हातात घेण्यात आलं आहे. 18 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता ही पाणी गळतीची समस्या आढळून आली आणि त्यामुळे दोष दूर करण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात आली. टीएमसी अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की STEM line मधून पाणीपुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला आहे, दुरुस्तीसाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. प्रभावित भागात मुंब्रा, रेतीबंदर, कळवा, खारेगाव आणि ठाण्यातील इतर अनेक भागांचा समावेश आहे. या काळात रहिवाशांना आवश्यक वापरासाठी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टीएमसीचे अधिकारी शक्य तितक्या लवकर सामान्य पुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.(हेही वाचा: Mumbai Wate Lake Evaporation: मुंबईच्या घशाला कोरड? उन्हाचा ताप, बाष्पीभवन वाढले; पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा घटला).
ठाण्याच्या काही भागात आज कमी दाबाने पाणीपुरवठा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)