Thane Shocker: ठाणे महानगरपालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; पिण्याच्या पाण्यात आढळले मृत प्राण्यांचे अवयव

रहिवाशांनी त्याचे फोटो एक्सवर टाकत महानगरपालिकेला टॅग करत त्याबाबतची तक्रार केली आहे. गांधी नगर, कापूरबावडी, मानपाडा भागामध्ये पाण्यात मृत प्राण्यांचे अवयव आढळल्याचे समोर आले आहे.

Dead Animals Part Found in Drinking Water: ठाणे महानगपालिकेचा सावळागोंधळ समोर आला आहे. नागरिकांना चक्क पिण्याच्या पाण्यात मृत प्राण्यांचे अवयव आढळले आहेत. एका रहिवाशाने X वर त्याबाबतची पोस्ट करत, 'लोकांना त्यांना पुरवलेल्या पिण्याच्या पाण्यातून मृत प्राण्यांचे काही भाग बाहेर येत असल्याचे आढळले. गांधी नगर, पोखरण 2, कापूरबावडी आणि मानपाडा भागात या घटना घडल्या आहेत.' असे म्हटले. त्याशिवाय, या प्रकरात दोषी असलेल्या नागरी संस्थांवर कारवाईची मागणी केली आहे. पोस्टमध्ये रहिवाशाने त्यासंदर्भातील फोटो शेअर केले आहेत. (हेही वाचा:Gujarat Farmer Finds Lion Family in Courtyard: मुसळधार पावसामुळे हैराण सिंहाचा शेतकऱ्याच्या गोठ्यात आश्रय(Watch Video) )

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)