Thane News: बदलापूरमधील एका महिलेची सोनसाखळी लुटली, दृश्य कॅमेरात कैद

बदलापूर मध्ये भरदिवसा एका महिलेच्या गळातील सोनसाखळी चोरट्यांनी लुटल आहे. संपुर्ण दृश्य कॅमेरात कैद झाले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Viral video Snatch gold chain PC twitter

Thane News: देशात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. एक महिला चेन स्नॅचिंगला बळी पडली. महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये महिलेची सोनसाखळी लुटण्यात आली. बदलापूर पश्चिम येथील अरिहंत अक्षय सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बदलापूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी भरदिवसा एका महिलेची सोनसाखळी लुटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही महिला सोसायटीत एकटीच फिरत असताना महिलेच्या जवळ आलेल्या दोन दरोडेखोरांनी तिची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावले. गुन्हा करून दोघेही पसार झाले. अद्यापही या चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement