Thane Fire: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील सिनेवंडर मॉलजवळ भीषण आग; इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची भीती (Watch)
आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वंडर मॉलच्या मागे भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. घोडबंदर रोडलगत कापूरबावडी जंक्शनजवळील ओरियन बिझनेस पार्क या व्यापारी संकुलात ही आग लागली आहे. घोडबंदर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर आगीचे मोठे लोळ उठत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बचाव पथके घटनास्थळी पोहोचले आहेत. अजूनतरी कोणतीही जीवित हानी झालेली नाही. (हेही वाचा: Dhule: धुळ्यात मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 4 महिलांचा होरपळून मृत्यू)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)