Bal Thackeray Smrutidin 2023: शिवतीर्थावर Thackeray कुटुंबाने घेतले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन (Watch Video)
काल शिवतीर्थवर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर भिडले आहेत.
शिवतीर्थावर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिक त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी जमले आहेत. काल यावरूनच शिंदे आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला होता. त्यानंतर आज ठाकरे कुटुंब स्मृतिस्थळावर आले आहेत. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यावेळी स्मृतिस्थळावर आले होते. काल आदित्य ठाकरेंनी झालेल्या राड्यावर भाष्य करताना ' ही एक दुर्दैवी घटना आहे, कारण जी गद्दार गँग आहे, जे घाबरले आहेत जे बाप चोरत पक्ष चोरणारे लोक आहेत, जे गुजरात आणि गुवाहाटीला पळून गेले त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही'. असं म्हटलं आहे. Shivsena Clash: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर राडा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार.
पहा व्हीडिओ
View this post on Instagram
A post shared by ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsena)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)