Swine Flu: नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूमुळे महिलेचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक; आरोग्य यंत्रणा अलर्टवर

नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Photo Credit : PTI

Swine Flu: सध्या उन्हाळयाचे दिवस सुरू आहेत. नागरिक उन्हाच्या तीव्र झळांनी त्रस्त असतानाच सिन्नरमधील एका महिलेचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू (Woman dies due to Swine Flu) झाला आहे. त्याशिवाय, नाशिक(Nashik) शहरातच दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क(Health department on alert) झाली आहे. रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब नमुने घेतले जात आहेत. त्याची तपासणी करण्यात येणार आहे. या आधी नागपूरमध्ये गेल्या वर्षी दिवाळीत ८ नागरिकांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला होता. (हेही वाचा :Swine Flu in UK: ब्रिटनमध्ये भीतीचे वातावरण! माणसांमध्ये आढळला 'स्वाइन फ्लू'चा पहिला रुग्ण )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement