SW Monsoon 2023 Update: आनंदवार्ता! महाराष्ट्रात अखेर नैऋत्य मान्सूनचे आगमन- IMD

दक्षिण कोकणातील काही भाग,द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग,संपूर्ण गोवा,कर्नाटकचा‌ व तामीळनाडू व आंध्रप्रदेशचा‌ काही भाग व्यापला असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे.

Rain | Pixabay.com

मागील काही दिवस उन्हाच्या तडाख्याने सारेच हैराण आहेत. त्यामुळे सार्‍यांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. आयएमडी ने अशामध्ये एक आनंदवार्ता दिली आहे. महाराष्ट्रामध्ये यंदाच्या  नैऋत्य मान्सूनचे आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग,द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग,संपूर्ण गोवा,कर्नाटकचा‌ व तामीळनाडू व आंध्रप्रदेशचा‌ काही भाग व्यापला असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. एकीकडे चक्रीवादळाचा धोका असताना महाराष्ट्रात यशस्वीपणे मान्सूनचे आगमन झाले आहे. IMD Alert: रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांना इशारा, येत्या 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)