Surekha Yadav ठरल्या पहिल्या महिला लोको पायलट; सीएसएमटी ते सोलापूर चालवली वंदे भारत एक्सप्रेस (Watch Video)

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या सुरेखा यादव यांनी 13 मार्च 2023 (सोमवार) रोजी सोलापूर स्टेशन ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली.

Surekha Yadav

सुरेखा यादव यांच्या रुपात भारताला आशियातील पहिला महिला लोको पायलट मिळाला आहे. सुरेखा यादव यांनी सीएसएमटी ते सोलापूर अशी सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या सुरेखा यादव यांनी 13 मार्च 2023 (सोमवार) रोजी सोलापूर स्टेशन ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली. 450 किमी पेक्षा जास्त लांबचा प्रवास पूर्ण करून ट्रेन नियोजित वेळेच्या पाच मिनिटे आधी CSMT ला पोहोचली. सीएसएमटी येथील फलाट क्रमांक ८ वर तिचा सत्कार करण्यात आला.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)