Supriya Sule On NCP Dispute: आम्ही आशावादी! राष्ट्रवादीबद्दलच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ- सुप्रिया सुळे (Watch Video)
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सांगितले की, आम्ही प्रचंड आशावादी आहोत. आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. आम्हाला माहिती आहे आम्ही योग्य बाजूला आहोत, असेही त्या म्हणाल्या.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यामुळे पक्षाचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला. या निर्णयाबाबत बोलताना पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सांगितले की, आम्ही प्रचंड आशावादी आहोत. आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. आम्हाला माहिती आहे आम्ही योग्य बाजूला आहोत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. (हेही वाचा, 'NCP चे 'दादा' अजित पवार' या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर MNS कडून जुना व्हिडिओ पोस्ट)
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)