Supriya Sule On Disqualification Petitions: प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी; सुप्रिया सुळे यांची पक्षप्रमुख शरद पवारांकडे मागणी

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

Supriya Sule | (Photo Credits: ANI/ Twitter)

Supriya Sule On Disqualification Petitions: अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर काही मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचाही समावेश होता. आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्याकडे केली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'श्री. सुनील तटकरे आणि श्री. प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाच्या घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन करून पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे. माझी मा. शरद पवार यांना विनंती आहे की, त्यांनी तात्काळ कारवाई करून भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका सक्षम प्राधिकार्‍यासमोर संसद सदस्य - श्री. प्रफुल्ल पटेल आणि श्री. सुनील तटकरे यांच्या विरोधात दाखल करावी.' (हेही वाचा - Sharad Pawar On Maharashtra Political Crisis: तीन महिन्यात सगळा खेळ बदलून टाकेन, गेलेले सर्व आमदार परत येतील; शरद पवारांचा मोठा दावा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)