SRA Scam Case: एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर Kishori Pednekar यांची चौकशी; निकटवर्तीयाला अटक
या प्रकरणी दादर पोलिसांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निकटवर्तीयालाही अटक केली आहे.
एसआरए घोटाळ्याप्रकरणी दादर पोलिसांनी मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली. त्यांना उद्या पुन्हा बोलावले आहे. आतापर्यंत एफआयआरमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. एकूण 9 जणांनी एसआरए फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याची तक्रार दाखल केली होती, मात्र या लोकांना घरे मिळालीच नाहीत. या प्रकरणी दादर पोलिसांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निकटवर्तीयालाही अटक केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)