Speed Limit On Expressway To Be 140? एक्स्प्रेस वेवरील कमाल वेगमर्यादा ताशी 140 किमीपर्यंत वाढणार? जाणून घ्या काय म्हणाले सरकार

द्रुतगती मार्गावरील कमाल वेग मर्यादा 140 किमी प्रतितास वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही

Union Minister Nitin Gadkari | (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसांपासून बातमी होती, सरकार एक्‍सप्रेस हायवे वर वाहनांची कमाल वेग मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे. आता आज सरकारने स्पष्ट केले की, द्रुतगती मार्गावरील कमाल वेग मर्यादा 140 किमी प्रतितास वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, दुपदरी रस्ते आणि शहरातील रस्त्यांवरील वेगमर्यादा बदलण्याचा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी नाकारले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now