Snake Rescue Video: कोब्राला पकडताना प्राण्याने दंश केल्याने सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)
सुनील या कोब्राला रेस्क्यू करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. अहवालानुसार, सुनील यांनी एका घरात कोब्रा रेस्क्यू केला त्यानंतर या सापाला ते गोणीमध्ये भरत असताना सापाने त्यांना दंश केला.
Snake Rescue Video: एका कोब्राला पकडताना त्या प्राण्याने दंश केल्याने सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोंदियाच्या फुलचुर येथील सुनील नागपुरे असे या सर्पमित्राचे नाव आहे. सुनील यांना कोब्राने दंश केला व त्यानंतर काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. सुनील या कोब्राला रेस्क्यू करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. अहवालानुसार, सुनील यांनी एका घरात कोब्रा रेस्क्यू केला त्यानंतर या सापाला ते गोणीमध्ये भरत असताना सापाने त्यांना दंश केला. त्यानंतरही कसेतरी त्यांनी तो साप गोणीत भरले. नंतर त्रास होऊ लागल्यावर सुनील यांना तात्काळ गोंदिया शहरातील केटीएस रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)