Sindhudurg-Hyderabad Flight: अलायन्स एअर 1 फेब्रुवारीपासून सुरु करणार सिंधुदुर्ग-हैदराबाद विमानसेवा
1 फेब्रुवारीपासून अलायन्स एअर या कंपनीतर्फे हैद्राबाद म्हैसूर- सिंधुदुर्ग- म्हैसूर-हैद्राबाद या दुसऱ्या विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या कोकण भागातील सिंधुदुर्ग या पर्यटन स्थळाला 1 फेब्रुवारीपासून हैदराबाद आणि म्हैसूरला जोडणारे दुसरे अलायन्स एअर फ्लाइट मिळणार आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी याबाबत माहिती दिली. 1 फेब्रुवारीपासून अलायन्स एअर या कंपनीतर्फे हैद्राबाद म्हैसूर- सिंधुदुर्ग- म्हैसूर-हैद्राबाद या दुसऱ्या विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येत आहे. विमानतळाच्या ऑपरेटरने सोमवारी सांगितले की, अलायन्स एअर हैदराबाद ते म्हैसूर मार्गे सिंधुदुर्ग अशी विमानसेवा आठवड्यातून दोनदा चालवेल. 9 ऑक्टोबर 2021 पासून विमानतळाचे व्यावसायिक कामकाज सुरू झाले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)